हरवलेले व चोरी गेलेले तब्बल ३५ मोबाईल जप्त करुन मुळ मालकास परत हिंगोली पोलिसाचा उपक्रम

हरवलेले व चोरी गेलेले तब्बल ३५ मोबाईल जप्त करुन मुळ मालकास परत 
 शुक्रवार 31मार्च 2023

हिंगोली जिल्हयातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालुण हरविलेले मोबाईल ताब्यात घेण्याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. जी. श्रीधर यांच्या आदेशा प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री एस. एस. घेवारे यांच्या नियंत्रणात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
विशेष पथकाने हिंगोली जिल्हयातील हरवलेले व चोरी गेलेले मोबाईल संदर्भाने तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहिती काढुन हिंगोली तसेच बाहेर जिल्हयातुन किं.अं. ३,५५,०००/- रुपये असे एकुण ३५ अॅन्ड्राईड मोबाईल जप्त केले आहेत. सदर कार्यवाही दरम्यान माबाईल चोर आरोपी नामे शेख वशिम शेख दौलत रा. अण्णाभाऊ साठे नगर हिंगोली यास ताब्यात घेवुन पोस्टे हिंगोली शहर येथे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आलेली आहे.

सदर जप्त करण्यात आलेले मोबाईल मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे मोबाईल धारकास बोलावुन घेवुन त्यांना परत केले आहेत. सर्व जनतेस कळविण्यात येते की चोरीचा मोबाईल कोणीही वापरू नये तसेच गहाळ झालेला मोबाईल सापडल्यास जवळचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोस्टे हिंगोली येथे आणुन जमा करावे. तसेच कोणाचाही मोबाईल चोरी अथवा गहाळ झाल्यास जवळीचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोस्टे येथे तकार करावी.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, मा. पोलीस निरीक्षक श्री पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, रोहीत मुदीराज, इरफान पठाण, दिपक पाटिल यांची नेमणुक करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم