कळमनुरी शहरात एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची मोठी कारवाई

कळमनुरी शहरात एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची मोठी कारवाई 

 महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
30मार्च 2023

हिंगोली जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल ) चा शोध घेवुन कार्यवाही करण्याच्या सुचना हिंगाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी पो.नि पंडीत कच्छवे यांना दिले होते त्या अनुशंगाने पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक  शिवबास. घेवारे यांच्या अभिपत्याखाली एक पथक थापण करण्यात आले होते.

आज दुपारी  स्था. गु.शा पोलीस पथकात मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या अनुशंगाने स्था. गु.शा पोलीस पथकाने पो.स्टे कळमनुरी अंतर्गत इंदिरानगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजयसिंग हत्यारसिंग टाक वय २५ वर्ष रा. इंदिरानगर कळमनुरी जि. हिंगोली याचे घरी छापा मारला असता सदर आरोपीचे ताब्यात एक पिस्टल (अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. 
आरोपीस  ताब्यात घेवुन पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे आरोपी अजयसिंग हत्यारसिंग टाक याचे विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे सपोनि घेवारे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउपनि के.. एस. सोनुळे करीत आहेत.

या  कार्यवाही जी श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली,  अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, पो. नि पंडीत कच्छवे स्था. गु.शा. याचे मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा चे सपोनि  शिवबास  घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन तसेच पो.स्टे कळमनुरी चे पो.नि. वैजनाथ मुंडे, पोलीस अंमलदार यादव कुडमुते, महीला इश्रत कादरी यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم