वसमत शहर ३० हजाराचा गुटखा जप्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम

वसमत शहर ३० हजाराचा गुटखा  जप्त 
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर  कदम 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 शुक्रवार 24मार्च2023

वसमत शहर पोलिसांनी गुलशननगर भागात एका घराजवळ साठवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारला. यात प्रतिबंधित •असलेला गुटखा जप्त केला. शहर पोलिसांच्या • छाप्यात ३१ हजार ३८५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या या छाप्यामुळे वसमत शहरात गुटखा साठा करणारे व विक्री करणारे दास्तावले आहेत.
वसमत शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत वाहनाद्वारे गुटखा शहरात आणून राजरोसपणे पानपट्ट्यांवर व ग्रामीण भागात फिरून विक्री करणारे ही अनेक आहेत या प्रकाराविरोधात वसमत शहर पोलिसांनी छापा सत्र सुरू केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या अवैधधंद्या विरोधातील कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन करताना वसमत शहर पोलिसांनी गुरुवारी
गुलशननगर भागात छापा मारला गुलशन नगर भागातील शेख नाहेद शेख लाल कुरेशी रा वसमत हा त्याचे घरी महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा बाळगुन आहे.
 असी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने  कारवाई केली

शेख नाहेद शेख लाल कुरेशी वय ३५ वर्षे रा. गुलशन नगर वसमत याचे त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे  घराच्या  पाठीमागील झोपडी मध्ये पांढ-या रंगाच्या नायलॉनचे पोत्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व गुटखाजन्य पदार्थ मिळुन आले पोलीस पथकाने जप्त केलेल्या गुटख्याची मोजणी केली असता ३१ हजार ३८५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या तक्रारीवरून शेख
नाहीत  शेख लाल कुरेशीच्या विरोधात विविध  कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्याच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस हवालदार गारोळे, शंकर हेंद्रे, गुंडरे, वडगावे, तुरूकमाने 
समावेश होता.
  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक भोसले, महिपाळे गारुळे हे पुढील तपास  करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم