हिंगणी येथील सार्वजनिक भिमजयंती महोत्सवाला परवानगी देण्याची मागणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 एप्रिल 2023
हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सवा साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने नकार दिला असुन याठिकाणी भिमजयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील हिंगणी येथे मागील वर्षी २०२२ मध्ये शांततेत पार पडली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास पोलिस दुटप्पी भुमिका घेतल्याने गावात वाद होत आहे असा आरोप हिंगणी येथील सुवर्ण समाजातील महिलांनी केला होता. त्यामुळे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीला ग्रामस्थानी कोणताही विरोध दर्शविला नसतांना पोलिस प्रशासनाने स्वतःहुन भिमजयंतीला परवानगी दिली नाही. त्यामुळे जयंती महोत्सवाला परवानगी देण्याबाबत समाज माध्यमांवर मागणी करणार्या पोलिसांच्या भेदभाव पुर्ण निर्णयाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार विरोध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या हुकूमशाहीचा आंबेडकरी जनतेमधुन तिव्र निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे हिंगणी येथील भिमजयंतीसाठी जिल्हा प्रशासनाने विनाअट परवानगी देवुन पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. तसेच किरण घोंगडे, भंते काश्यप यांच्यासह ४७ कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे. भिमजयंतीमुळे दवाव येत असल्यास सरकारच्यावतीने बौद्ध समाजाचे इतरत्र पुनर्वसन करुन स्वतंत्र ग्राम देण्यात यावे. तसेच कळमनुरी तालुक्यातील दाती येथील बौद्ध तरुणांचा झालेली मारहाण व महिलांची छेडछाड करण्यात आल्या प्रकरणी गावात भेट देण्यासाठी गेलेल्या राजीव कांबळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्या पुर्ण कराव्यात नसता धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर हिंगणी सार्वजनिक महोत्सव समिती अध्यक्ष अनिता सरतापे, आझाद समाज पार्टी प्रदेश सचिव ऍड.रावण धाबे, युवक रिपब्लिकन सेना प्रदेधाध्यक्ष किरण घोंगडे, राजु कांबळे, ऍड.अभिजित खंदारे, राजकुमार सरतापे, लखन सरतापे, प्रमोद इंगोले, प्रकाश दांडेकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
إرسال تعليق