हिंगोलीत रामदास पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा. संपन्न
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 एप्रिल 2023
श्री.पंजाब देवकर व मित्रपरिवारातर्फे आयोजित सत्कार समारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळा सिटी प्राइड नैवेद्यम हॉटेल येथे संपन्न
मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. बीड श्री. शिवप्रसाद जटाळे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘लोणारकाव्य’ या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी मा. रामदास पाटील सुमठाणकर हिंगोली लोकसभा श्री सुनील कावरखे साहेब (नायब तहसीलदार सेनगाव) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रकाश निळकंठे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश वानखेडे, श्री. हरिभाऊ मुटकुळे, श्री. गजानन बोरकर, श्री. सुभाषअप्पा जिरवणकर आणि श्री. रामकिशन जाधव हे मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने देवकर मित्रपरिवार उपस्थित होता.
यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार तर आणि सर्व मित्रमंडळीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था हिंगोली च्या वतीने श्री. जटाळे साहेब यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनराज चिल्ले तर आभार प्रदर्शन श्री.महादेव गाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रकाश घ्यार, श्री.नरसिंग मगर, श्री लक्ष्मण सताळकर, श्री.नेताजी सुभेदार श्री.चंद्रकांत सूर्यवंशी आणि श्री.रामेश्वर नेहूल यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق