29 एप्रिल 2023
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. जी. काबळे हिंगोली यांनी आरोपीस खुनाच्या केस मध्ये जन्मठेपेची शिक्षा व रू. ३०००/- दंड ठोठवला.
सविस्तर माहिती अशी की
हिंगोली जिल्हयातील सवना, ता. सेनगाव, जि.हिंगोली येथील कुंडलिक
शिवराम नायक वय ८० वर्षे रा. सवना, हयाने दि.२५/०२ / २०२२ रोजी रात्री ०१:०० ते ०१:१५ दरम्यान त्यांची पत्नी सुंदराबाई हिस स्वयंपाक उशीरा का केल्याच्या कारणावरून वाद केला व तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचे हातपाय बांधुन तिच्या अंगावर रॉकेल टाकुन तिला पेटवुन जाळले. ती उपचारा दरम्यान मरण पावली. तसेच पुरावा नाहीसा केला. या प्रकरणी गोरेगाव पो.स्टे. येथे गु.र.नं. ३२ / २०२२ कलम ३०२,२०१, भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद होवून, गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील
पोलीस हवालदार राहुल गोटरे ,काशिनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका पार् पाडली
दरम्यान प्रकरणास मा. न्यायालयात सत्र खटला क. ६५ / २०२२ देण्यात आला. सदर प्रकरण हे हिंगोली अप्पर सत्र न्यायाधीश श्री. डी. जी. कांबळे यांचेसमोर चालले. सदर प्रकरणात सहा सरकारी वकील श्री. एस. डी. कुटे यांनी एकुण ११ साक्षीदार तपासून युक्तीवाद केला यामध्ये फिर्यादी, मृत्युपूर्वी जबाबब नोंदविणारे वैदकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असुन अप्पर सत्र न्यायाधीश श्री .डी. जी. कांबळे साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली यांनी आज दि. २९/०४/२०२३ रोजी सत्र खटला क. ६५/२०२२ महाराष्ट्र शासन विरूध्द कुंडलिक नायक रा. सवना ता. सेनगाव. जि. हिंगोली या प्रकरणात आरोपी कुंडलीक नायक यास कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये जन्मठेप व रू. ३०००/- दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास तीन महिना कठोर कारावास आणि भा.द.वी २०१ मध्ये तीन वर्षे कारावास व दोन हजार रू दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा सोबतच भोगाव्यात. असा आदेश झाला आहे.
उपरोक्त प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. श्री. एस. डी. कुटे यांनी बाजु मांडली त्यानां सरकारी वकील श्री. एन. एस. मुटकुळे व श्रीमती सविता एस. देशमुख यांनी सहकार्य केले. व कोर्टपैरवी अंमलदार पि.ए. मार्कड यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق