हिंगोलीच्या पैलवानाने बोलोरो जीप पळवली
तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
बुधवार 5 एप्रिल 2023
हिंगोली कळमनुरी - नांदेड रस्त्यावरील बायपासवर उत्तराखंडमधील स्थापत्य अभियंत्यास वाहनाच्या झालेल्या नुकसानीचे पैसे आत्ताच दे असे म्हणून पैलवानासह इतर तिघांनी जबरदस्तीने बोलेरो जीप घेऊन गेल्याने कळमनुरी पोलिसात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा
महाराष्ट्र 24 न्यूज चा विशेष वर्धापन
आपल्या सेवेत 24 तास
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्तराखंडमधील स्थापत्य अभियंता प्रविण हिरासिंग राणा यांच्यासह साक्षीदारांना पैलवान रा. हिंगोली यासह इतर तीन आरोपीतांनी ३ एप्रिल रोजी कळमनुरी - नांदेड रस्त्यावरील बायपासवर आमच्या वाहनाच्या झालेल्या नुकसानीचे पैसे आत्ताच्या आता दे अन्यथा तुझे वाहन घेऊन जातो असे म्हणून त्यांच्या ताब्यातील बोलेरो जीप क्र. एमएच १२ टीके ५७८९ ही जबरदस्तीने घेऊन गेल्याने कळमनुरी पोलिसात पैलवान यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनुळे हे करीत आहेत.
إرسال تعليق