जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण  तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह  सहा जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

 महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
 शुक्रवार 7 एप्रिल 2023

हिंगोली सेनगाव व हिंगोली तालुक्यात जवळपास अडीच कोटी रुपयाचे राशनधान्य स्वस्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने अतिरिक्त वाटप केल्याने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह अनेकांवर सेनगाव पोलिसांत १६ मार्च रोजी तर हिंगोली पोलिसात तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह २० जणांवर हिंगोली शहर पोलिसात २९ मार्च • रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. • अद्याप पर्यंत या गुन्ह्यातील एकही आरोपी अटक नसून त्यांनी अटकपूर्व जामीनकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यावर ६ एप्रिल रोजी सुनावणी होऊन सहा जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

सेनगाव तालुक्यात जानेवारी २००४ ते डिसेंबर २०१८ या दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेत जवळपास २ "कोटी ८ लाख ५५ हजार ५४ रुपयाचा गहु व तांदुळ अपहार प्रकरणात शासनाची आर्थिक फसवणुक केल्याने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तत्कालीन सेनगाव तहसीलदार आर.के. मेंढके यांच्यासह इतर
दोषी अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा आरोपी अटक झाला नाही. विभागातून जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीत स्वस्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने अतिरिक्त धान्य वाटप केले होते. सदर धान्य ३ कोटी रुपयापेक्षा अधिक किंमतीचे होते. त्यात काहीजणांनी रकमेचा भरणा केला. परंतु ३३ लाख रुपये वसूलपात्र रक्कम भरली नसल्याने २९ मार्च रोजी मध्यरात्री परिविक्षाधीन तहसीलदार हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी हिंगोली शहर पोलिसात फिर्याद दिल्याने तत्कालीन  तहसीलदार गजानन शिंदे, तत्कालीन अव्वल कारकून कैलास वाघमारे, तत्कालीन गोदामपाल, अतिरिक्त पदभार अव्वल कारकुन इम्रान पठाण, बी.बी. खडसे यांच्यासह काही स्वस्त धान्य दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता 

सेनगाव हिंगोली तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने स्वस्त धान्य वाटपात अनियमितता व फसवणुक केल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी हे दोन्ही गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहेत.
 त्याचा तपास
पोलिस निरीक्षक उदय खंडेराय हे करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये अद्याप पर्यंत एकही   आरोपी अटक करण्यात आले नव्हते 
दरम्यान यातील काहीजणांनी
न्यायालयात अटकपूर्व जामीनकरिता अर्ज दाखल केला होता.
 जिल्हा सत्र न्यायाधिश क्र. २ डी. जी. कांबळे यांच्या न्यायालयात ६ एप्रिल रोजी अटकपूर्व जामीनवर दोन्ही विधीज्ञांनी युक्तीवाद केला. ज्यामध्ये सरकारी अभियोक्ता एस.डी. कुटे यांनी भक्कम बाजु मांडल्याने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांचा न्यायालयाने जामीन  फेटाळला 

हिंगोली तहसीलचे तत्कालीन तहसीलदार गजानन संभाजी शिंदे, कैलास वैजनाथ वाघमारे, इम्रानख़ान नसीमखान पठाण, भारत बाबाजी खडसे व रास्तभाव दुकानदार गणाजी मुकींदा बेले, मिलिंद निवृत्ती पडघन यांच्या अटकपूर्व जामीन करिता जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ चे न्या. आर. व्ही. लोखंडे यांच्यासमोर दोन्ही विधीज्ञांनी युक्तीवाद केला. ज्यामध्ये सरकारी अभियोक्ता सविता . देशमुख यांनी भक्कम बाजु मांडल्याने या पाचही जणांचा अटकपूर्व जामीन हिंगोली न्यायालयाने  फेटाळला आहे 

Post a Comment

أحدث أقدم