राज्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा हिंगोलीचा पारा 41 अंशावर
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
11 मे 2023
मोचा चक्रीवादळ सक्रिय होताच राज्यात हवेत असलेले बाष्प कमी झाल्याने उष्णतेची लाट येत आहे. गुरुवार भुसावळचा पारा देशात सर्वाधिक 44.8, तर जळगावचा पारा 44.6 अंशांवर गेला होता.
त्यामळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. आज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाला गती मिळताच वाऱ्याचा वेग वाढला. या वाऱ्याने बहुतांश भागात असलेले हवेतील बाष्प शोषून घेण्यास सुरुवात केल्याने कमालीचा उकाडा पुन्हा जाणवू लागला असून, राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
भुसावळ शहराचा पारा देशात सर्वाधिक 44.6 अंशांवर गेला. यंदाच्या उन्हाळ्यातील हे देशभरातील उच्चांकी तापमान ठरले. त्या खालोखाल अकोला शहराचे तापमान 43.5 अंशांवर गेले होते. विदर्भासह मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडाही तापू लागला असून, आगामी दोनच दिवसांत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला आहे.
देशातील सर्वाधिक तापलेली शहरे
जळगाव (महाराष्ट्र): 44.6, अकोला (महाराष्ट्र)-43.5,अलाहाबाद 43.2, अहमदाबाद 42.2, भूज 42.3, पाटणा 42.
राज्याचे तापमान..
जळगाव : 44.6, अकोला 43.5, पुणे 40.1, नगर 40.1, कोल्हापूर 35.7, नाशिक 40.2, सांगली 37.3, सोलापूर 40.4, मुंबई 33.6, रत्नागिरी 34.1, धाराशिव 39.6, छत्रपती संभाजीनगर 40.2, परभणी 41.6, नांदेड 41.4, बीड 41.4 हिंगोली 41 अंशावर तापमान गेले आहे
नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
إرسال تعليق