वृक्ष लागवड काळाची गरज आपापल्या घरी 50 वृक्षाची नर्सरी करावी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शुक्रवार12 मे 2023
हिंगोली वृक्ष लागवड हि काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी या करिता शासनाने हर घर नर्सरी उपक्रम व माझी वसुंधरा अभियान राबविणेबाबत आदेशित केले आहे.
मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविणे सुरु आहे. यानुसार ११ मे रोजी नगर परिषद कार्यालयात नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना सदर उपक्रमा देण्यात आली. बाबत मार्गदर्शन करून रोपे वाटप करण्यात आले.जेणेकरून कर्मचारी यांनी आपआपल्या घरी कमीत कमी ५० रोपट्यांची नर्सरी तयार करावी व त्याचे संगोपन करावे.येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करिता रोपांची कमतरता भासणार नाही. तसेच येत्या पावसाळ्यात सदर नर्सरीमध्ये तयार करण्यात आलेल्या रोपांना आपल्या अंगणात, घरा समोरील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या दुतर्फा
लावण्यात यावी व त्याचे संगोपन करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी या घटकानुसार वृक्षलागवड, त्याचे संवर्धन, संगोपन करणे, हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे, पाण्याचा योग्य वापर व जतन करणे, अक्षय उर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणे इत्यादी बाबत माहिती
यावेळी माजी नगर सेवक निहाल भैय्या, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, लेखापाल अनिकेत नाईक, स्थापत्य अभियंता रविराज दरक, कपिल धुळे, किशोर काकडे, वसंत पुतळे, सनोबर तसनीम, बाळू बांगर, अशोक गवळी, संदीप घुगे, विजय रामेश्वरे, आशिष रणसिंगे, प्रवीण चव्हाण, स्वाती अंतापुरकर, कमलेश इंगळे, चित्र वर्मा, ललिता खंदारे, करण पाईकराव, कार्तिक आकाश गायकवाड रवी गायकवाड यांच्यासह आदी अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोपटे वाटप करण्यात आले
إرسال تعليق