अल्पवयीन मुलीचे फोटो फेसबुकवर केले व्हायरल दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 8 मे 2023
हिंगोली फेसबुकवर अल्पवयीन मुलीच्या नावे बनावट अकाउंट बनवून त्यावर तिचे अश्लील फोटो व्हायरल केले. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथे ३० एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उशिरा ६ मे रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
तिचा पाठलाग करीत होते. लपून-छपून व जबरदस्तीने तिचे फोटो काढले. तसेच आमचेशी लग्न कर नाही तर बदनामी करू, अशी धमकीही दिली. मुलीच्या नावे फेसबुकवर अकाउंट तयार करून तिचे फोटो त्यावर अपलोड करून प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कार्तिक भगवान खंडके, शिवाजी रामचंद्र मस्के (दोघे रा. शेनोडी) असे आरोपींची नावे आहेत. मागील दीड ते दोन महिन्यापासून आरोपी हे मुलीचा पठलाग करीत होते
या घटनेचा तपास
पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे हे करीत आहेत
إرسال تعليق