जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जागृत व्हा ,,,, संबोधी अकादमी सर्वेसर्वा भीमराव दादा हत्तीआंबिरे

जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जागृत व्हा ,,,, संबोधी अकादमी सर्वेसर्वा भीमराव दादा हत्तीआंबिरे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9मे  2023 
परभणी  दिनांक 8 मे  परभणी तालुक्यात असलेल्या साडेगाव येथे आज नव चैतन्य बुद्ध विहार चे  उद्घाटन  संबोधी अकादमी चे सर्वेसर्वा भीमराव दादा हत्तीआंबिरे यांच्या हस्ते करण्यात आले  सकाळी साडेगाव येथे गावातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली नंतर पूज्य भंते डॉ उपगुप्त महस्थविर यांच्या हस्ते मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली उपस्थित बुद्ध उपासक उपासिका यांना भंते उपगुप्त म्हास्थिविर यांनी त्रि शरण दिले आणि धम्मदेशना दिली ,यावेळी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करताना भीमराव दादा म्हणाले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंता साठी मोठ्या प्रमाणात काम केले  आपल्याला बुद्ध धम्म दिला  ,आपण ही आपल्या पोटजाती ला मूठ माती देऊन बाबासाहेबांचे जे स्वप्न होत भारत बुद्ध मय करण्याचे ते काम करण्यासाठी शिक्षण घेऊन जागृत होन गरजेचे आहे ,तरच भारत बुद्ध मय झाल्याशिवाय राहणार नाही असे मत भीमराव दादा हत्ती अबिरे यांनी आज साडे गाव येथे मार्गदर्शन करताना व्यक्त केले ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नव चैतन्य बुद्ध विहार समिती चे भगवान घोडके ,गंगाधर घोडके ,संजीव घोडके , राजकुमार घोडके ,जनार्दन घोडके ,उमाजी घोडके सखाराम घोडके. सिद्धार्थ वायवळ, बहुजन मुक्ती चे सुभाष दादा साडे.विकास आलने यांनी परिश्रम घेतले सर्वांना अन्नदान करण्यात आले.भीमराव दादा यांनी सर्व समाज बांधवांना आकरा हजार रुपयाची मदत केली आणि हार्दिक शुभेच्या दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم