भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम पोलिसात गुन्हा दाखल

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
बीड प्रतिनिधी 
 मंगळवार23 मे 2023 

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन धूम ठाकली आहे. एका व्यक्तीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने त्याच कुटुंबातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आपले सूत जुळवून तिला घेऊन . पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी भोंदूबाबाविरुद्ध युसूफवाडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात- आहे. धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली असे या बाबाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खेडेगावातील एका इसमावर रुग्णालयात उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांच्या सांगण्यावरून धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली या महाराजांशी संपर्क साधला. दरम्यान, या बाबाने आपण आयुर्वेदिक पद्धतीने यावर उपचार करून तुमचा आजार लवकरच बरे करतो, असे आश्वासन देऊन उपचार सुरू केले होते.
भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल... मुलीला घेऊन बाबा फरार झाला तर इकडे मुलगी घरी परत कशी आली नाही? म्हणून आईसह नातेवाईकांनी शोध सुरू केला. परिसरातील नातेवाईकांकडे विचारपूस केली; परंतु मुलगी काही घरी आलीच नाही. शेवटी मुलींच्या आईने शुक्रवारी युसूफवाडगाव पोलिसांत धोंडीराम महाराज • भोसले ऊर्फ माऊली या भोंदूबाबानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यावरून भोंदूबाबाविरुद्ध केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापूराव काळे हे करीत आहेत.

कुटुंबातील सर्वाचा विश्वास संपादन केला आजारी व्यक्तीला आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून बरे करण्याचा दावा या भोंदूबाबाने दिला. त्यामुळे त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांनी देखील विश्वास ठेवला. “तब्बल वर्षभरापासून हा बाबा उपचार करत होता. त्यामुळे नित्यनेमाने दररोज हा भोंदूबाबा उपचार करण्यासाठी चारचाकी वाहनातून यायचा. या काळात त्याने कुटुंबातील. सर्वांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्याच्या मनात मात्र दुसरेच काही सुरू होते

Post a Comment

أحدث أقدم