पंजाब राठोड यांची बिनविरोध निवड गावकऱ्याकडून जंगी स्वागत
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
शनिवार27 मे 2023
औंढा तालुका खरेदी- विक्री संघाची निवडणूक २५ मे रोजी बिनविरोध करण्यात आली. १५ जागांसाठी १५ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
औंढा तालुका खरेदी-विक्री संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. २५ में अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. निवडणुकीसाठी ३२ जणांनी अर्ज दाखल केले होते. ३२ पैकी २ अर्ज अवैध ठरले तर ३० अर्ज वैध ठरले. यापैकी १५ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पंधरा जागांसाठी केवळ पंधराच उमेदवार राहिल्याने बिनविरोध निवड झाली. यामध्ये
गजानन शेळके, कुंडलिक राखोंडे, गोविंद राठोड, पंडित कदम, कोंडिबा सोळंके, म. फैसल शेख फरीद, आप्पाराव आहेर, सुधाकर नवले, अश्फाक तय्यबखाँ पठाण, द्रोपदा ढोबळे, अरुणा सातपुते, शिवदास दमाने, विजय साळवे, शेख फरीद मोहम्मद इसाक आदींची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहायक उपनिबंधक मुकुंद देशमुख यांनी काम पाहिले.
إرسال تعليق