मोप येथे चुलत भावाला मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 मे 2023
हिंगोली तालुक्यातील
कनेरगाव नाका येथून जवळच असलेल्या मोप येथील घटना दिनांक 27 मे 2023 रोजी घरासमोरील रोडवर घर बांधकामासाठी वाळू खाली करत असताना चुलत भावा - भावांमध्ये वाद झाला तो वाद इतका विकोपाला गेला की चार जणांनी एका भावाला पकडून लाथा- बुक्क्याने मारहाण केली व काठीने डोक्यात व पाठीत मारून त्याला खाली पाडले, नंतर दोघांनी हात व पाय पकडून त्याला विष पाजण्याचा प्रयत्न केला.
आरोपी घराचा दरवाजा तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करत असताना
नंतर गावातील काही शेजारील माणसे धावून येऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न झाला व त्यानंतर हनुमान तुकाराम बर्वे याला चक्कर व उलट्या होत होत्या त्याला तात्काळ सामान्य रुग्णालय हिंगोली येथे
उपचारासाठी भरती करण्यात आले
हनुमान तुकाराम बर्वे यांनी दिनांक 29 मे 2023 रोजी फिर्यादीमध्ये असे सांगितले की रामराव नामदेव बर्वे, केशव नामदेव बर्वे,गणेश नामदेव बर्वे, व सुधाकर नामदेव बर्वे यांनी मला लाथा बुक्क्या मारून मला विष पाजण्याचा प्रयत्न केला व माझ्या घराचे दरवाजाचे कोंडे तोडून एक हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून
गोरेगाव पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर हे करत आहेत.
إرسال تعليق