हिंगोली कृउबा समिती सभापतिपदी राजेश पाटील, तर उपसभापती अशोक सिरामे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 मे 2023
हिंगोली येथील बाजार समिती सभापती व उपसभापती पदासाठी २३ मे रोजी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापतीपदी अशोक सिरामे यांची निवड झाली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजेदरम्यान सभापती, उपसभापती निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी सभापती पदासाठी राजेश पाटील गोरेगावकर, डॉ. रमेश शिंदे व श्यामराव आली. जगताप हे तिघेजण इच्छुक होते. यातील डॉ. रमेश शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सभापती पदाच्या शर्यतीत राजेश पाटील गोरेगावकर व श्यामराव जगताप दोघे राहिले. यावेळी गुप्त मतदान घेण्याची मागणी अध्याशी अधिकारी नवनाथ वगवाड यांच्याकडे काही संचालक मंडळीकडून करण्यात येत होती. यावरून सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चर्चेचे गु-हाळ चालल्यानंतर अखेर हात उंचावन मतदान घेण्याचे होता.
ठरले. यात राजेश पाटील गोरेगावकर यांना १२, तर श्यामराव जगताप यांच्या बाजूने सहा जणांनी हात उंचावून मतदान केले. यात राजेश पाटील गोरेगावकर यांची सभापतिपदी निवड झाल्याचे अध्याशी अधिकारी वगवाड यांनी जाहीर केले.
उपसभापती पदाच्या शर्यतीत अशोक सिरामे व उत्तमराव वाबळे होते. यावेळी वाबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने सिरामे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात
निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे, माजी आ. गजानन घुगे, अँड. के. के. शिंदे, संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, अॅड. अमोल जाधव, भानुदास जाधव यांच्यासह संचालक मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला
१ ऐनवेळी राष्ट्रवादीला लागली लॉटरी
हिगोली बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच सदस्य भाजप, शिवसेना, काँग्रेस यांच्या पॅनलमध्ये निवडून आला आहे. मात्र, या एकमेव सदस्याला कोणतेच पद मिळणार नाही अशी चिन्हे होती. परंतु, ऐनवेळी विरोधी गटाने त्यांना उचलून धरल्याने अशोक शिरामे यांना उपसभापतिपद द्यावे लागले तर दुसरीकडे तीन सदस्य असलेल्या शिवसेना शिंदे गटाला काहीच मिळाले नाही.
सभापतिपदाला विरोधी गटाकडून शामराव जगत यांनी अर्ज भरला होता. जगताप यांना सत्ताधाऱ्यातील बेबनाव आपल्या फायद्याचा ठरेल असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. उपसभापतिपदाच्या वेळी जी खेळी झाली ती सभापतिपदाच्या वेळी होणार नाही, याची प्रचिती आधीच आणि अपेक्षित होते.
إرسال تعليق