दिवाळीतील प्रदूषणामुळे अजूनही हिंगोलीकरांना जाणवतोय धुळीचा त्रास वयोवृद्ध झाले हैराण

दिवाळीतील प्रदूषणामुळे अजूनही हिंगोलीकरांना जाणवतोय धुळीचा त्रास वयोवृद्ध झाले हैराण 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
18 नोव्हेंबर 2023
हिंगोली : नगरपालिकेने दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र हिंगोली शहर फटाक्यांच्या आवाजात दणाणून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. धूर व धुळीने अजूनही शहरवासीय त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली शहरात १२ नोव्हेंबरपासूनच फटाक्यांचे धमाके होण्यास प्रारंभ झाला होता. या दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठेत तर फटाक्यांच्या लडींचा आवाज घुमताना दिसत होता. शिवाय गल्लोगल्लीही लक्ष्मीपूजनानंतर फटके फोडल्यामुळे शहरभर फटाक्यांचा दणदणाट होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी

पाडव्यालाही पुन्हा तेच चित्र असल्याचे पहायला मिळाले. फटाके फोडण्यासाठी लहान मुलेही मागे नसल्याचे दिसून येत होते. या फटाक्यांमुळे सगळीकडेच ध्वनी प्रदूषणाने उच्चांक गाठला होता. यावर्षी काहींनी तर कानठळ्या बसविणाऱ्या सुतळी बॉम्बमुळे त्रस्त केले होते. आकाशात रंगीबिरंगी आतषबाजीही होताना दिसत होती. भाऊबिजेलाही अनेकांनी फटाके फोडले. या दिवशी
तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्याने पुन्हा दिवाळी साजरी केल्याचे चित्र पहायला मिळाले. अजूनही शहरातील काही भागात अधूनमधून फटाक्यांचे आवाज येतच आहेत.
फटाक्यांच्या धुराने व उडणाऱ्या धुळीनेही शहरात वायू प्रदूषण वाढविल्याचे दिसून येत आहे. शिवाय शहरातील विविध भागांत फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा उचलताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहेत. अजूनही कचरा उचलण्याचे काम सुरूच असल्याचे दिसते. दिवाळीत पूजनासाठी आणलेले खांब, फुलांचेही अनेक ठिकाणी ढीग पहायला मिळत असून लहान बालक व वयोवृद्ध नागरिक  यांना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे 

Post a Comment

أحدث أقدم