बनावट मृत्यूपत्र तयार करून तीन कोटींची जमीन हडप, हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 8 जणावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 नोव्हेंबर 2023
हिंगोली : बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तीन कोटी रुपयांची मालमत्ता परस्पर नावावर करून घेतल्याप्रकरणी 8 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील गणेशवाडी तिरुपतीनगर सर्व्हे ११ व १२ प्लॉट नं.२ व ३ परस्पर नावावर करून घेतल्याची तक्रार ऐश्वर्या भाकरे यांनी पोलिसाना दिली आहे. वडील डॉ. सीताराम सखाराम भाकरे व भाऊ डॉ. स्वप्नील सीताराम भाकरे यांची मी व माझी दुसरी आई वंदना सीताराम भाकरे व लहान बहीण आराध्या सीताराम भाकरे असे कायदेशीर वारस असताना देखील बनावट मृत्यूपत्र तयार करण्यात आले असून
आई- वडिलांच्या नावावर असलेली गणेशवाडी सर्व्हे नं.१४ येथील प्लॉट क्रमांक २,३ मधील अंदाजे ३ हजार ९३२ चौरस मीटर व ३ कोटी रुपये किमतीची जमीन आरोपींनी नावे करून घेतली. त्यांना बाभुळगाव येथील ग्रामविकास अधिकारी.यांनी बनावट मृत्यू चा दाखला दिला आहे.
यात आरोपी अँड. शेख झियोउद्दीन (नांदेड) ॲड मतीन पठाण (हिंगोली) यांच्या सोबत संगणमत करून बाभूळगाव येथील शिवाजी गायकवाड, शेख अखिल शेख खलील, (हिंगोली) संतोष श्रीराम भिसे, कन्हैय्या सत्यनारायण खंडेलवाल, (हिंगोली) बाभूळगाव येथील ग्रामविकास अधिकारी तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करत आहेत
إرسال تعليق