जिल्हा रुग्णालयातील भांडारगृहात चोरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद

जिल्हा रुग्णालयातील भांडारगृहात चोरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद 

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
22 नोव्हेंबर 2023
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडारगृहातून दोन सक्शन मशीनसह दहा स्टेथोस्कोप पळविल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी ३५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला 

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या मुख्य इमारतीत भांडारगृह असून, या ठिकाणी विविध मशीन साहित्य ठेवण्यात आलेले आहे
२० नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी भांडारगृहाच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला.
२५ हजार रुपये किमतीच्या दोन सक्शन मशीन व १० हजार ६६० रुपयांचे दहा स्टेथोस्कोप असा एकूण ३५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद का 
याप्रकरणी भागवतसिंग तुकाराम शिसोदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश  ठोके करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم