आदिवासी समुदायाची उपजीविका संवाद विश्राम गृह हिंगोली येथे संपन्न

आदिवासी समुदायाची उपजीविका संवाद विश्राम गृह येथे संपन्न

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
22 नोव्हेंबर 2023 
उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव हे नुकतेच थायलंड येथे संपंन झालेल्या परिषदेत हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समूहाचे प्रश्न आणि उपाय याविषयी मांडणी करण्यासाठी गेले होते. 
जगातील 7 देशातील 34 व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात भारतातील 4 संस्थेचा समावेश होता. 
आदिवासी समुदाय हा जंगलाच्या साहाय्याने जीवन व्यतीत करीत असते त्यातूनच त्याला जीवन उपयोगी संसाधन मिळत असतात परंतु हावस्या पोटी जंगले संपुष्टात आली आणि परिणामी स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले. 

आदिवासी समुदायाला उपजीविका उपलब्ध निर्माण करून देण्यासाठी  आदिवासी बहुल असलेले राजदरी, आमदरी, सोनवाडी आणि पिंपळदरी या गावामध्ये उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने उपजीविका निर्मितीसाठी काही उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच शेतकरी व भूमिहीन कुटुंबांच्या क्षमतेमध्ये वृद्धी करून त्यांचा शाश्वत विकास करण्यात येणार असल्याचे पाईकराव यांनी सांगितले. 

सदरील गावामध्ये पारंपरिक शेती पद्धती व स्थानिक पिके संवर्धन करण्यावर भर देण्यात येईल. यामध्ये गुंजवळी, गोळ्या, पिवळी ज्वारीचे प्रकार आहेत तर खडक शेपू, तरवटा, तांदुळ कुंद्रा, हडसन अश्या रानभाज्या संवर्धन करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.
सदरील कार्यशाळेत उगम संस्थेच्या सल्लागार सुशीला पाईकराव, कोषाध्यक्ष रेखा साठे, सदस्य ज्योती कांबळे, तुकाराम इंगोले व जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, भीमराव भिसे, कृष्णा भिसे, दत्ता भोयर यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم