बाळापूरात आ. संतोष बांगर यांना दाखविले काळे झेंडे
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
25 नोव्हेंबर 2023
आखाडा बाळापूर : एका खासगी कार्यक्रमानिमित्त आखाडा बाळापूर येथे आलेल्या आमदार संतोष बांगर यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न करीत काळे झेंडे दाखविले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ताफा निघून गेला.
आखाडा बाळापूर येथील युवा सेनेचे पदाधिकारी सचिन पेंढारकर यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला
आमदार संतोष
बांगर यांनी हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास कार्यक्रम करून परतताना शेवाळा रोडवरील आंबेडकर चौकात सकल मराठा समाजाच्या तीन ते चार कार्यकर्ते बांगर यांच्या ताफ्याला आडवे झाले. त्यांनी बांगर यांना काळ झेंडे दाखवले. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा दिल्या. तात्काळ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, तर आ. बांगर यांचा ताफाही त्याच काही वेळाने पुढे सरकला.
إرسال تعليق