मनोज जरांगे यांची ७ डिसेंबर रोजी दिग्रस क.पाटीवर विराट सभा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 नोव्हेंबर 2023
मनोज जरांगे
पाटील यांची सभा ७ डिसेंबर रोजी दिग्रस क. पाटीवर आयोजित करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
सभेच्या अनुषंगाने २३ नोव्हेंबर रोजी डिग्रस कन्हाळे येथे डिग्रस व परिसरातील गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. यानंतर मराठा समाजबांधवांनी विचारविनिमय केल्यानंतर ७ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिग्रस येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरालगत असलेल्या ११० एकरांवर जरांगे पाटील यांची सभा दुपारी एक वाजता होणार आहे. या सभेत जरांगे पाटील हे सकल मराठा समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. सभा अगोदर जरांगे पाटील हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर हिंगोली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारी बारा वाजता रॅलीने डिग्रस फाटा सभास्थळी आगमन करतील. आठ दिवसांपासून सभास्थळावर साफसफाई सुरू असून विविध समित्यांची स्थापनाही केली आहे
إرسال تعليق