महाराष्ट्र लोकविकास मंचाचा यंदाचा पुरस्कार समाज सेविका सुशीलाताई पाईकराव यांना जाहीर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
29 नोव्हेंबर 2023
सुशिलाताई ही एक ग्रामिण भागातील सामाजिक कार्यकर्ती आहे. मागील ३५ वर्षापासुन हिंगोली जिल्ह्यातील वंचित व गरीब महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे अविरत कार्य करीत आहे. सुशिला म्हणजे ‘सुंदर - वागणुक’ होय. आपल्या नावाप्रमाणे सर्वासोबत त्यांचा विकास करणे हे त्यांचे कार्य आहे, आपण छंद ही म्हणू शकतो. काही व्यक्तीमत्व असे असतात कि ते आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुशिला जयाजी पाईकराव होय. यांच्या सामाजिक कार्यामुळे समाजामध्ये अमुलाग्र बद्दल पाहायला मिळतो याचमुळे त्यांना महिला व बाल विकास विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, स्वा सै श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानच्या श्रीमती इंद्रायणी बोधनकर पुरस्कार आणि हिंगोलीरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यांचा जन्म १९६० साली ‘जुमडा’ या गावी झाला. त्या वेळी या गावाचे अस्तित्व नकाशा वरही नव्हते. या गावाची लोकसंख्या केवळ २५ व्यक्ती आणि १० कुटुंब ऐवढी होती. त्यांच प्राथमिक शिक्षण हे सिरसम बु. येथे पुर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी नांदेड येथे प्रवेश घेतला व त्याचे माध्यमिक शिक्षण १० वी. पर्यंत केले. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची सवय जडली. त्यामध्ये व्यावहारीक ज्ञान, कला, इतिहास, समाजसुधारकांचे कार्य व भाषणे असे पुस्तके जेथे मिळतील तेथे वाचायला सुरुवात केली. त्यांचे लग्न वयाच्या १६ व्या वर्षी झाले. लग्नानंतर पती (जयाजी) ना त्यांनी शिक्षणास पाठविले. जयाजीसरांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये सामाजिक कार्याचे (MA in social work) शिक्षण पुर्ण केले.
पतीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कयाधु ग्राम विकास संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या अंतर्गत गावविकासाची कामे करीत. संस्थेचे कार्य ५ गावामध्ये होते. हि गावे ५ कि. मी. च्या व्यासमधील होती. संस्थेचे काम पती करीत असत पण कार्य महिलांसोबत असल्याने महिलांना एकत्रित करणे त्यांना माहिती देणे पुरुषांना जमत नसे म्हणून सुशिलाताईला सोबत जावे लागत असे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे सायकल नव्हती त्यामुळे त्यांना पायदळ सर्व गावी फिरावी लागत असत. उन्हाळ्यात अनवाणी पायाने चालावे लगे तर कधी पळसाची पाने पायाला बांधून अंतर कापावे लागत असे. ज्या ओढ्याला पाणी मिळेल ते पिऊन प्रवास सुरु ठेवावा लागत असे. पावसाळ्यात विजांचा कडकडाट व पावसाचा मारा, समाजाचं बोलणं सर्व सहन करून समाजकार्य सुरु ठेवले.
हिंगोली जिल्हा त्या वेळेस परभणी ह्या जिल्हयातील एक तालुका होता. सन १९९९ पासुन हिंगोली जिल्हा हा वेगळा झाला. ह्या जिल्हयाचे वैशिष्ट्ये म्हणजे “मागासलेल्या विभागातील मागासलेला जिल्हा”. सौ. सुशिलाताईनी यानी ह्या जिल्हयाच्या विकासासाठी फुल नाही पण फुलाची पाकळी तयार करण्यास कसलही कसर सोडलेली नाही. सुशिलाताईनी हिंगोली जिल्ह्यातील पहिला महिला स्वयंसहाय्य गट जुमडा या छोट्याशा गावामध्ये तयार केला व नंतर हिंगोली जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये बचतगट स्थापन केले. बचतगट म्हणजे प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणुन एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात. बचत गट हे पैसा जमा करुन आपण आपली समस्या सोडवु शकतो, हि त्या बचतगटाची संकल्पना होती. बचतगटामुळे संघटन तर तयार होतेच त्याचबरोबर बचत व काटकसरीची सवय लागते. बचतगटामुळे अडीअडचणीच्या वेळेस तातडीच्या गरजा भागविण्यासाठी सावकाराकडुन कर्ज घ्यावे लागत नाही. बँकेचे व्यवहार माहित होतात. बँकेकडुन उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होते. सर्वात महत्वाचे म्हणजे महिला स्वावलंबी होतात. आणि घरातुन बाहेर पडुन त्यांना नवीन बाबी शिकण्याची संधी मिळते. ह्या बाबी महिलांना सांगुन व पटवुन महिला बचतगट ताईनी तयार केले.
*बचतगट*
सुशिलाताई या बचतगटाचा उपयोग ग्रामिण विकासासाठी करुन घेतला. ग्रामिण भागामध्ये त्यावेळी सामाजिक लिंगभाव ही मोठी समस्या होती. स्त्रीनां समाजामध्ये दुय्यम स्थान दिलेले होते, स्त्रीया पतिला देवमानुन, त्याच्या अज्ञेचे पालन करणे हे कर्तव्य समजावे लागत होते. त्यामुळे स्त्रीयांना कुटुंबामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता. जे वाट्याला येईल ते खायायचे आणि पुरुष वर्ग सांगेल तेवढे काम करायचे, म्हणजेच ‘चुल आणि मुल’ हि स्त्रीयांची भुमिका होती. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी स्त्रीयांना ‘महिला संघटनाची’ गरज होती. म्हणुन सुशिलाताईनी महिलाना एकत्रीत केले कारण, ‘पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो आणि महिला शिकली तर पुर्ण कुटुंब शिकविते’. म्हणून बहुतांश वेळा महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करुन त्यामध्ये पुरुषवर्गांना सुध्दा सामाविष्ट करुन घेतले. त्याद्वारे स्त्री पुरुष समानता, महिलांचे घरामधील स्थान, महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग अशा विषयावर जागरुक केले. बाबासाहेब म्हणतात, ‘सामाजाची प्रगती ही महिलाच्या विकासावरुन मोजली जाते’. म्हणूनच स्त्रीचा विकास झाला म्हणजेच गावाचा विकास झाला हे म्हणणे जास्त वावगे ठरणार नाही. बचतगटामुळे महिलांचा आत्मविश्वास तर वाढलाच त्याचबरोबर समाजात दर्जा सुध्दा सुधारला. कारण ज्याच्या कडे पैसे त्याला सन्मान, प्रतिष्ठा, आदर मिळतो.
*प्रथमोपचार*
कंजारा या गावी राहत असताना त्यागावामध्ये प्रथमोपचाराची काही व्यवस्था नव्हती. त्याकाळी ग्रामीण भागात आरोग्याची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती त्यामुळे गावातील व्यक्तीना बरेचशा समस्यांना समोर जावे लागत असे. गावामध्ये दवाखानाची व्यवस्था नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रसुती हि गावातील महिला कडून होत असे. गरोदर महिलांना गरोदरपणातील काळजी व स्तनंदामातानी बाळाची काळजी कशा प्रकारे घ्यावी ह्रा बद्दल माहिती नव्हती. किशोरवयीन मुलींना वैयक्तीक काळजी कशी घ्यावी याबदल त्या जागरुक नव्हत्या. ग्रामीण भागातील लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्व नव्हते. बाळंतपण व त्यानंतर 6 आठवडे आई व बाळाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. जन्मलेल्या बाळाची काळजी नीट न घेतल्यामुळे अनेक अर्भकमुत्यु होतात व मातामृत्युही खुप होत. त्यामुळे योग्य सल्ला व काळजी घेणे गरजेचे असे. पुर्वी बाळ जन्मल्यानंतर बाळांच्या तोडांत मध टाकले जायायचे तर काही वेळेस त्या बाळाला गाईचे दुध पाजले जायायचे. खरे तर मध हे पचनास खुप जड असते आणि ते बाळाला पचन्यास अवघड जाते. त्यामुळे काही वेळेस बालमृत्यु सारख्या समस्यांना समोरे जावे लागले. बाळासांठी चिकदुधाचे महत्व हे ताईनी गावागावात जावून लोकांना पटवून सांगितले. जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दुध बाळाला मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिबंधक शक्तीही वाढते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशिची बाळाला उबही मिळते. खेडेगावात काही वेळेस बाळ जन्मल्याबरोबर त्याला आंघोळ घालतात अशा वेळेस त्यांना जागरूक करण्याचे काम ताईनी केले. ह्यासाठी ताईनी ‘इंडीयन रेडक्रॉस सोसायटी’ कडुन रुग्णालय सहाय्यक अभ्यासक्रम पुर्ण केला व ‘इंडीयण मेडिकल असोशियशन’ कडून ‘प्रथमोपचार’ पहे प्रशिक्षण पुर्ण केले.
*जादुटोणा*
गावामध्ये देवावर विश्वास ठेवणे हे ग्रामिण भागातील खास वैशिष्ट होते. कोणताही रोग झाला तर लोक त्याला देवाचा शाप म्हणून बघत. काही वेळेस जादुटोना झाला म्हणुन ईलाज करण्यासाठी तांत्रिकांकडे घेऊन जात. तांत्रिकाला परतफेड म्हणून बकरा किंवा कोंबड्याचा बळी द्यावा लागत असे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला साप चावतो तेव्हा त्याला तांत्रिकाकडे घेवुन जात असत आणि तो तांत्रिक काही तरी बडबडत असे आणि ईलाज पुर्ण करीत असे. बराच वेळेस व्यक्ती वाचत असे कारण विषारी सापाची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक तांत्रिकावर जास्तच विश्वास ठेवत असत. गावातील महिलांना मुल होत नसेल तर देवाला नवस बोलल्यास मुल होते असा त्यांचा गैरसमज होता काही वेळेस तुकारामाच्या ओळी त्यांना सांगावे लागत असे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘नवसामुळे पोरं बाळं होती, तर का करावे लागे पति’. या सर्व समस्यांवर उपयोग म्हणुन ताईनी प्रथमोपचार मेडीसीनची किट घेवून गावातील आरोग्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे गावातील जादुटोण्याचे प्रमाण कमी झाले. त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ‘अरोग्यमित्र’ या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पुर्ण केले.
*निर्धुर चुल*
ताईनी निर्धुर चुल, शोषखड्डा व बायोगॅस यांचे प्रशिक्षण गौपुरी, वर्धा येथे पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी गावातील बचतगटांना, शेतकरी गटांना, महिला मंडाळांना निर्धुर चुलीचा वापर व फायदे या बद्दल जागरुक केले. गावामध्ये जास्त प्रमाणात स्वयंपाकासाठी चुलीचा वापर होतो ती चुल म्हणजे मातीची. गावामध्ये बराच घरांना मोठी खिडकी नसते त्यामुळे चुलीचा धुर हा घरातच घुटमळत असतो. त्यामुळे डोळे जळजळ करतात आणि छातीत ही दुखते. धुरामुळे घरात कीटकाचे प्रमाण वाढते. घरांची उंची कमी असल्यामुळे घराची पत्रे काळी पडतात व मर्यादेपेक्षा लवकर खराब होतात. काही कुटुंबाना जास्त रुंद खोली नसल्यामुळे त्याघरामध्ये कपडे ठेवतात व ते धुरामुळे पिवळसर पडतात आणि लवकर खराब होतात ह्या बाबी लक्षात आणून पर्याय म्हणून निर्धुर चुल ही संकल्पना समोर आणली. निर्धुर चुल ही पेटविण्यासाठी सुलभ असते व धुर धुराड्यावाटे बाहेर टाकल्यामुळे डोळ्यांना व छातीला होणारा त्रास कमी होतो व त्यामुळे आरोग्य चांगले राहते. व निर्धुरचुलीला इंधनपण कमी लागते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी तर झालाच महिलांनि झपाट्याने स्वीकार केला.
*स्वच्छता*
गावामध्ये अस्वच्छता व रोगराई पसरविण्यास कारण म्हणजेच विनाकारण साचलेले पाणि होय. कारण गावामध्ये जवळजवळ प्रत्येक मानसाच्या घरासमोर पाण्यांचा सांडवडा दिसतो. कारण गावात आडाचे, विहीरीचे व हातपंपचे पाणि असते व कपडे धुण्यासाठी बराच घराती व्यक्ती त्या साधनाच्या पाण्याचा उपयोग करतो व ते पाणि रस्त्यावर दिसते. सांडपाणी घराजवळ साचुन डबकी तयार होतात हे दृष्य आपल्याला सहज गावामध्ये दिसते. व त्यापासुन डासांची निर्मिती होते. कारण डास पाण्याशिवाय निर्माण होत नाही. सांडपाण्यावर वाढणाया डासांमुळे हत्तीरोग होतो, तर स्वच्छ पाण्यावर वाढणाया डासांमुळे मलेरिया पसरतो. म्हणून शहरापेक्षा ग्रामीण भागातच हिवतापाचे प्रमाण जास्त असते. डासांवर नियत्रंण आणि परिसर स्वच्छतेसाठी ताईने शोषखड्डयाचे महत्व गावागावात पटवून सांगीतले आणि त्याचबरोबर स्वच्छतेचे काम सुरु झाले. गाडगे महाराज म्हणतात, ‘नवशिक्षणाची सुरवात ही स्वच्छतेपासुन होते’ म्हणुनच ताईकडून ही नवीन सुरुवात होती
*शिवणकला*
महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थान होते आणि तिचे काम म्हणजे ‘चुल आणि मुल’. त्यामुळे महिलांना घराच्या बाहेर जाणार प्रतिबंध असे. म्हणुन महिलांना घरीबसुन घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी व स्वावलंबी बनविण्यासाठी शिवणकला प्रशिक्षण आयोजित केले. त्यावेळी बराच महिलांनी त्या प्रशिक्षणात समावेश घेतला होता. त्यामुळे महिलांही कुटुंबात आर्थिक मदतीसाठी हातभार लावत असत. पैसा महिलांचा असल्यामुळे घरात निर्णय प्रकियेत विशिष्ट समावेश दिसुन येत असे. आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वत:ची वैयक्तिक आवड जोपासत डोळयांसमोर निश्चीत उदिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे. त्यानुसार मार्ग आखत योजनाबध्द सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपुर्वक टप्प्या टप्प्यात विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वत:तील कौशल्यगुणाना वाव देत राहणे हे सर्वानाच जमते असे नाही. म्हणूनच ताईनी दिशा दाखविण्याचे योग्य काम केले.
*बालहत्या*
मुलगी हे परक्याचे धन आहे असे म्हणुन समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. मुली म्हणजे डोक्याला ताप ही मानसिकता अद्याप संपलेली नाही. बरेचशे व्यक्ती म्हणतात तिच्या वाढविण्यावर खर्च,शिक्षणावर होणारा होणारा खर्च शेवटी वायफट जाणार आहे तर खर्च करुन काय फायदा या पेक्षा ती जन्मताच मेली तर चांगले. त्याचबरोबर हुंडयामुळे किंवा अन्य कारणांमुळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट, मानसिक, शारीरिक त्रास या वैतागाला कंटाळुन स्त्रिया आत्महत्या करत आहेत. वडिलांची मानसिकता बिघडत चालली आहे. महत्वाचे म्हणजे याच्या उलट तर, मुलगा हा मोठा झाल्यावर सोबत राहुन आधार देतो. मरणानंतर मोक्ष देतो आणि आपला वंश पुढे चालवितो. हि संकल्पना मोडीत काढून बालहत्या थांबविली व मुलींची ज्योत जिवंत ठेवली. आज आपण पाहतो की महिला ही बँक कर्मचारी, शिक्षिका, वकिल, डॉक्टर, राष्ट्रपती, इंजिनीअर इ. कामे करून घरातील कामे करते. पण पुरुष करतो का? तात्पर्य महिला ही पुरुषाबरोबर काम करते म्हणुन तिला समाजामध्ये जगु द्या अशा विषयावर संमेलन तसेच मेळावे घेतले. व्यक्ती स्वतंत्र घरात घरात रुजविले. ‘अगर बेटा शब्द है तो बेटी अर्थ है, अगर बेटा गीत है तो बेटी संगीत है’.
*हुंडा बळी*
हुंडा हि एक सामाजिक कुप्रथा आहे, ज्यामुळे स्त्रीयावर अकल्पनीय अत्याचार आणि गुन्हे घडत आहेत. ह्या कुप्रथेने समाजाच्या सर्व वर्गातुन बळी घेतले आहे. समाजामध्ये वराकडे नाही तर घराकडे पाहुन लग्न केले जाते. त्यामध्ये ते किती ही हुंडा देण्यास तयार असतात. हुंडा घेणारे कधी ही एकदाच हुंडा घेतात असे नव्हे तर ते लग्नानंतर सुध्दा पैस्याची मांगणी करतात. अशा कारणामुळे बराचश मुलीनी आत्महत्या केल्या आहेत. ताई म्हणतात, ‘जो हुंडा मागत असतो त्याला मुलगी नाही, त्याला पैसा हवा असतो.' हा एक दंडनीय गुन्हा आहे लोकांना सांगून हुंडा बंदी केली आहे.
ताई गेल्या ३५ वर्षापासुन समाजसेवेचे काम करीत आहेत. सुरुवातीच्या काळात उन्हापावसाची पर्वा न करता पायदळ गावोगावी जाऊन लोकांचा, समाजाचा त्रास सहन करीत कार्य सुरू ठेवले। घराची परिस्थिती हलाखीची असून सुद्धा त्यांनी काम करण्याची जिद्ध सोडली नाही. कारणापेक्षा ध्येयाना नेहमी मोठं केलं. ‘जे पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जे डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात.’ या उक्तीप्रमाणे त्यांनी ध्येय गाठीत ग्रामीण भागातीळ गरीब व वंचितांना विकासासाठी हातभार लावला. ग्रामिण भागातील ८,००० महिलांना एकत्र आणून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाह्यामध्ये आणले आहे. महिलांमध्ये नेतृत्व व निर्णय क्षमता कमालीची वाढल्याने महिलांनी स्वताची बँक तयार केली आहे. सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्र विकास, १९७२ च्या दुष्काळात अन्नाचा दुष्काळ पडला होता. अन्न प्रश्नाचा तिढा फूड फॉर वर्क च्या योजनेतून सोडविला होता. खिल्लारी मधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये मोठा वाटा आहे. अश्या विविध कामात सुद्धा ताईंनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे.
ताई सध्या उगम ग्रामीण विकास संस्था व सावित्रीबाई फुले स्वयंसहायता जिल्हा गटाच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार निवड समिती व शालेय शिक्षण गुणवत्ता तपासणी समितीच्या सदस्य आहेत. रानभाज्या हा कविता संग्रह त्यांचा लोकप्रिय आहे. , धम्मभूषण पुरस्कार, भारत सुकन्या पुरस्कार, हिंगोलीरत्न पुरस्कार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या कडून प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा हा मागासलेल्या विभागातील म्हणजेच मराठवाड्यातील मागासलेला जिल्हा आहे म्हणुन ताईनी जिल्हाच्या विकासासाठी ‘फुल नाही पण फुलांची पाकळी’ तयार केली आहे. चूल आणि मूल हि संकल्पना मोडून महिलांना एक आदर्श घडविऱ्या सुशिलाताईचे नाव आहे
إرسال تعليق