रस्त्यात अडवून सख्या भावाचा दगडाने घाव घालून खून

 रस्त्यात अडवून सख्या भावाचा दगडाने घाव घालून खून 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
01 डिसेंबर 2023
हिंगोली तालुक्यातील येळी येथे आईला का भांडतो या कारणावरून सख्ख्या भावाचा दगडाने घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे. या प्रकारात पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील येळी येथील राजू सुदाम खंदारे याचा त्याची आई सरस्वतीबाई यांच्या

 येळी येथील घटना
आई सोबत भांडण केल्याचे कारण
बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल देण्यासाठी जात असताना येळी चौकशीसाठी एकास घेतले ताब्यात
सोबत वाद झाला होता. या वादामध्ये राजू याने आईला मारहाण केली. या मारहाणीमध्ये सरस्वतीबाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी राहूल खंदारे याने त्यांच्या आईला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचे

सुचविले. त्यानुसार सरस्वतीबाईने रात्री बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार गावाजवळच राजू याने पुन्हा त्यांच्याशी वाद घातला. यावेळी त्याचा भाऊ राहूल याने राजू याच्या डोक्यात दगड मारला. दगडाचा घाव वर्मी बसल्यामुळे राजू जागीच कोसळला. यामुळे राजूचा मेंदूच बाहेर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक

सुरेश दळवी, बासंबा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुलाब खरात, संजय केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, राहुल तडकसे, प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मयत राजू याचा मृतदेह उत्तरे तपासणीसाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकारात पोलिसांनी राहूल यास चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. मयत राजू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने