कानरखेडा शिवारात पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी

कानरखेडा शिवारात पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
02 डिसेंबर 2023
कनेरगावनाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगाव व परिसरातील अनेक गावांत चार दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, गहू व हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामा करण्याचे आदेश देताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी कानरखेडा येथे जावून नुकसानीची पाहणी केली.
चार दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला. याचबरोबर काही भागात गाराही पडल्या होत्या. यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी १ डिसेंबर रोजी कानरखेडा व परिसरातील अनेक गावात नुकसानीची पाहणी केली व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकर देण्याच्या सूचना केल्या. 
 - यावेळी कानरखेड बु येथील सरपंच रामेश्वर भालेराव , वर्षाताई पठाडे उपसरपंच , मधुकर भालेराव रामजी भालेराव दीपक डोळसकर दिलीप भालेराव रवींद्र ढोरे बबन हरणे प्रकाश ढोरे समाधान पठाडे गणेश ढोरे गजानन पठाडे संभाजी पाटील विठ्ठल भालेराव दिनेश पठाडे विजय पठाडे सुभाष पठाडे आदी सह शेतकरी उपस्थित होते पालकमंत्री सोबत खासदार हेमंत पाटील आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल प्रशासनाचे तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने