गांजा तस्करी प्रकरणातील दोघांना पोलिसांनी केली अटक

गांजा तस्करी प्रकरणातील दोघांना पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
05 डिसेंबर 2023
 वारंगाफाटा येथील
नाकाबंदीदरम्यान कुर्तडी शिवारामध्ये पाठलाग करून पकडलेल्या गांजा प्रकरणातील दोन गांजा तस्करांना आखाडा बाळापूर पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

३ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजता वारंगाफाटा येथे आखाडा बाळापूर पोलिस नाकाबंदी करत होते. यावेळी हदगावकडून येणारी कार पोलिसांना पाहून दुरूनच पुन्हा
हदगावकडे वेगाने नेली. त्या कारचा पाठलाग केला असता कुर्तडी शिवारात दोघे जण कार सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते.
सदरील कारची तपासणी केली असता एका गाठोड्यात १ लाख ८० हजार १५० रुपयांचा ३६.३० किलो ग्रॅम गांजा, १८ हजार रुपयांचे दोन मोबाइल आणि ८ लाख रुपयांची कार असा ९ लाख ९८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता, कारमध्ये सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
यानंतर गांजा प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला असता एक रवी रामराव राठोड यास अर्धापूर येथून व त्याचा साथीदार जयपाल प्रभू राठोड यास त्याच्या राहत्या गावातून पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ३ डिसेंबर रोजीच उशिराने अटक केली असून त्यांना ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास वसमत येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने