महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
06 डिसेंबर 2023
राज्यात
आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्तते साठी आयटक संघटनेच्या वतीने कोल्हापूर ते नागपूर निघालेल्या महा संघर्ष यात्रेचे शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर२३ रोजी हिंगोली येथे आगमन होणार आहे हि यात्रा १८डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे यात्रेत आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस शामजी काळे, राज्य अध्यक्ष राजु देसले, राज्य उपाध्यक्ष कॉ.मुगाजी बुरुड, जिल्हा मार्गदर्शक यशवंत हिवराळे, राजीव दिक्षित, यांच्या सह आयटकचे जेष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
या महा संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यासाठी व मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्या साठी हिंगोली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनो हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा...कार्यक्रम *दिनांक:-- शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २३
*कार्यक्रमाची वेळ:- सकाळी १०.००वाजता
*कार्यक्रमाचे ठिकाण:-- शिवाजी महाराज पुतळ्या जवळच हिंगोली येथुन रॅलीला सुरूवात करुन हॉटेल रामकृष्णा येथे जाहीर सभा व सत्कार करण्यात येणार असून
सर्व आशा स्वयंसेविका यांनी आपल्या घरातील व्यक्ति व मोटर सायकल रॅलीसाठी मोटर सायकल सोबत घेऊन मोठ्या संख्येने यावे.
तरी जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी उपस्थित राहावे
प्रसिद्ध प्रमुख सुधाकर वाढवे
सुनिता कुरवाडे, वंदना पाईकराव,
माया राऊत, लक्ष्मण मालकर, सुनील वाढवेपांडुरंग कतुरे, वैशाली गरड, वंदना खरे, अणिता चव्हाण, रेखा कदम, राधाबाई पांचाळ, घोंगडेताई, सपकाळताई,सारिका चांदणे, सावित्रीबाई काळे,
तथा सर्व पदाधिकारी, आशा व गटप्रवर्तक आयटक हिंगोली जिल्हा.यांनी केली आहे
إرسال تعليق