जातीय सलोखा व सामाजिक सदभावना उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडुन कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
10 डिसेंबर 2023
हिंगोली जिल्हयामध्ये जातीय सलोखा अबधीत राहुन शांतता नांदावी सर्व नागरीकांनी सर्व जाती धर्माचा सन्मान व आदर राखुन सामाजिक सदभावना वाढावी या उददेशाने मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री.जी.श्रीधर यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलांतर्गत कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा दिनांक १०/१२/२०२२ पासुन १७/१२/२०२२ पावेतो संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर खेळविली जाणार आहे. सदर स्पर्धेत जिल्हयातील एकुण १३ पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा त्यात १) हिंगोली शहर २) यासंबा ३) कळमनुरी ४) औंढा नागनाथ ५) गोरेगाव ६) नर्सी नामदेव ७) सेनगाव ८) हिंगोली ग्रामीण ९) वसमत शहर १०) आखाडा बाळापुर ११) हटटा १२) वसमत ग्रामीण १३) कुरूंदा या १३ पोलीस स्टेशन व १४) पोलीस अधीक्षक कार्यालय १५) पोलीस मुख्यालय १६) शहर वाहतुक शाखा असे एकुण १६ किकेटचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे वैशीष्ट म्हणजे सदरील सर्व संघात पोलीस स्टेशन/शाखेचे ६ खेळाडु तर ईतर ०५ खेळाडु हे त्या त्या पोलीस स्टेशन हददीतील विवीध जाती धर्मातील युवक खेळाडु यांचा समावेश असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास व व्यक्तीगत उत्कृष्ट कामगीरी करण्या-या खेळाडुंना ट्रॉपी व चषक तसेच प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे.
आज दिनांक १०/१२/२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री.जी.श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, यांचे हस्ते सदर स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सपोनि राजेश मलपिलु ईतर अधिकारी अंमलदार, खेळाडु व प्रेक्षक नागरीक उपस्थित होते. सुरूवातीची मॅच पोलीस स्टेशन कळमनुरी विरूध्द पोलीस स्टेशन नर्सी नामेदव यांचेमध्ये खेळण्यात आली त्यात कळमनुरी संघाने १६ रणांनी सदरची मॅच जिंकली.
टिप्पणी पोस्ट करा