खंडणीच्या उद्देशाने खोटी फिर्याद देणे पडले महागात पोलिसात गुन्हा दाखल

खंडणीच्या उद्देशाने खोटी फिर्याद देणे पडले महागात पोलिसात गुन्हा दाखल 
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
11 डिसेंबर 2023
 हिंगोली : उद्धट बोलल्याप्रकरणी एकास अद्दल घडावी, त्याच्याकडून खंडणी घ्यावी या उद्देशाने एकाविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार केल्याची खोटी फिर्याद देणे चांगलेच महागात पडले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तालुक्यातील नर्सी फाटा परिसरात २० वर्षीय युवकावर १ ऑक्टोबर रोजी २०२३ रोजी अनैसर्गिक अत्याचार झाल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या पथकाने याप्रकरणी तपास सुरू केला होता 
 यात २० वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार झाला नसून खंडणी घेण्याच्या उद्देशाने अत्याचार झाल्याची खोटी फिर्याद दिल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या फिर्यादीवरून पवन उद्धवराव कानडे (रा. खानापूरनगर, परभणी), सुशील लक्ष्मण मोरे (रा. धार रोड परभणी), भीमराव रामराव पवार (ह.मु, परसावतनगर, परभणी) व अन्य एकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील एकाने कट रचून २० वर्षीय युवकासह अन्य दोघांनी मदत करून फसवणूक करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने