३० हजार रुपयांचा चिनी मांजा जप्त करुन तीन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
हिंगोली पोलीसाची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 डिसेंबर 2023
हिंगोली
चिनी मांजा विक्रीवर आळा घालण्यासाठी वेगवेगळे पथके स्थापन केले आहेत. या पथकामार्फत सोमवारी चिनी नायलॉन मांजा विक्री करणार्या पतंग विक्रेत्यांच्या दुकानावर छापा मारुन तीन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करुन ३० हजारांचा चिनी मांजा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हयात चिनी नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर आळा घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मांजा विक्री संदर्भाने कार्यवाही सुरु केली आहे. या अनुषंगाने स्थागुशा पथकाने सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी खटकाळी बायपास परिसरात राणी सती मंदिराजवळ इसम सुर्यकिरण मदनलाल बगडिया रा.गंगानगर यांनी नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोउपनि विक्रम विठुबोने यंाच्या पथकाने छापा मारुन २० हजार रुपये किंमतीचे ४० नायलॉन मांजाचे रोल जप्त करुन विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोउपनि माधव जिव्हारे यांचे पथकाने शहर हद्दीतील हरण चौक येथील महेश बालाराम मुदिराज यांच्या दुकानावर छापा मारुन ४ हजार ५०० रुपये किंमतीचे नायलॉन मांजाचे ९ रोल जप्त करुन सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या कार्यवाहीमध्ये महावीर चौक येथील इसम संतोष नारायण धाबे यांच्या पतंग विक्रीच्या दुकानावर छापा टाकुन ५ हजार ५०० रुपये किंमतीचे नायलॉन मांजाचे ११ रोल जप्त करुन सदर इसमाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाने सावरकर नगर येथील साहु पतंग विक्री सेंटर येथे, कळमनुरी व सिरसम येथे सुद्धा पतंग विक्री दुकानात छापे मारुन नायलॉन मांजा विक्री संदर्भात झाडाझडती घेण्यात आली. सपोनि राजेश मलपिल्लु यांचे पथक वसमत शहर व परिसरात नायलॉन मांजा विक्री संदर्भात पतंग विक्रेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेतली.
जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील पतंग विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, नायलॉन मांजा बाळगुनये व विक्री करु नये जणेकरुन पर्यावरणास व मानवी जिवितास हानी पोहचणार नाही. जो कोणी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना आढळल्यास यापुढे पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पोलिस दलांच्या वतीने करण्यात आली
إرسال تعليق