दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील चारही आरोपींचा जामीन मंजुर...


दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील चारही आरोपींचा जामीन मंजुर

03 जानेवारी 2024
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
प्रकरणाची थोडक्यात हकीकत,
दिनांक 26/11/2023 रोजी पोलीस उप निरीक्षक श्री. कपिल मुरलीधर आगलावे यांना गुप्त बातमीदारा द्वारे अशी माहिती मिळाली की, हिंगोली येथील बसस्थानकाच्या औंढा रोड लगत संरक्षण भिंतीजवळ काही इसम त्यांच्या हातात खंजीर, रॉड, पकड, दोरी इत्यादी दरोडा टाकण्याचे साहित्य घेऊन बसलेले आहेत. तरी मा. उप निरीक्षक साहेबांनी इतर पोलीस कर्मचारी सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन पाच व्यक्तिना धरुन त्यांच्याकडून एकूण 49,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सदरील व्यक्तिना अटक करुन पोलीस स्टेशन, हिंगोली शहर येथे गु.र.क्र. 910/2023 कलम 399, 402 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदविला.
सदरील गुन्ह्यात अटक आरोपी नामे, 1) फैजल खान रहिम खान, 2) फहिम खान अहेमद खान, 3) शेख शब्बीर शेख सिलावर, 4) मुसाहिब खान सलीम खान या चारही आरोपींनी विधीज्ञ अॅड. अजय ऊर्फ बंटी पंडितराव देशमुख यांच्या मार्फत जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. तरी वि.न्यायाधिश श्री.आर.व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण दि. 12/12/2023 रोजी सदरील चारही आरोपींचा जामीन अर्ज मंजुर केला आहे.

आरोपींच्या वतीने अॅड. सतिष देशमुख, अॅड. सुनिता देशमुख, अॅड. शामकांत देशमुख,

अॅड. प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय ऊर्फ बंटी पंडितराव देशमुख यांनी
युक्तिवाद केला. त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. आदित्य ऊर्फ शुभम सतिष देशमुख,
अॅड. राहूल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अॅड. योगेश खिल्लारी पाटील, अॅड. रजत देशमुख,
अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. अविनाश राठोड, अॅड. मुदस्सीर अ. रहिम,
अॅड. सुमित सातव, अॅड. एस. जे. जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. शुभम
मुदीराज, अॅड. सुजित गायकवाड, अॅड. गजानन घुगे, अॅड. सुमित कदम आणि अॅड. तुषार
पवार यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने