माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण अभियान हिंगोलीत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 फेब्रुवारी 2024
कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंढे,न.प.हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान,स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार हा रु.6001/-रोखरक्कम प्रमाणपत्र,द्वितीय पुरस्कार रु.5001/-रोखरक्कम प्रमाणपत्र , तृतीय पुरस्कार रु.3001/-रोखरक्कम प्रमाणपत्र घोषित करण्यात आला आहे. दिलेल्या विषयांवर दिलेल्या जागेवर येऊन पथनाट्य सादर करावे.
नोंदणी दि. 16/02/2024 ते 28/02/2024 सकाळी 09:00 पर्यंत करू शकता. सदर स्पर्धा हि दि. 28/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरु होईल.
स्पर्धेचे ठिकाण :- नवीन नगर परिषद, जिल्हा परिषद रोड, हिंगोली
2.पथनाट्य जास्तीत जास्त 20 मिनिटाचे असावे.
3.पथनाट्य दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर करणे अनिवार्य आहे.
4. सदर स्पर्धा हि सर्वांसाठी खुली आहे.
अधिक माहिती करीता संपर्क. आशिष रणसिंगे - 8149501014, कुणाल कांबळे – 9834244548
إرسال تعليق