महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
23जून2024
कनेरगाव नाका येथे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चार पालख्या मुक्कामी आल्या आहेत. पालख्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने व ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरानेटाळ मृदंगाच्या साथीत दुमदुमून गेला. या सर्वांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था श्री पुरुषोत्तम बाहेती व परिवार यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
आज शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून एका मागे एक पालख्यांचे कनेरगाव मुक्कामी आगमन झाले. सर्वप्रथम श्रीक्षेत्र चांदुरबाजार जि. अमरावती येथील संत गुलाबराव महाराज पालखी त्यानंतर अमरावती जिल्ह्यातीलच श्री महर्षी वाल्मिकी पालखी, वाशीम जिल्यातली श्री लोटांगणे महाराज पालखीही, श्री क्षेत्र माहागाव येथील स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु श्री संत हरिसा गुरुजी पालखी, यांचे कनेरगाव येथे आगमन झाले. एका मागोमाग एक पालख्या कनेरगाव मध्ये आल्याने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. मुकामी आलेल्या ह्या पालख्यांचे श्री पुरुषोत्तम बाहेती व परिवारा तर्फे पूजन करण्यात आले. सर्व पालखीच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था बाहेती परिवारातर्फे करण्यात आली आहे.
إرسال تعليق