अवैध्दरित्या विकी करीता घेवुन जाणा-या देशी दारू विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची बेधडक कार्यवाही

अवैध्दरित्या विकी करीता घेवुन जाणा-या देशी दारू विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची बेधडक   कार्यवाही

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
30जून2024

तब्बल 16 पेटी देशी दारू किं. 77 हजार रू. व स्वीफ्ट कार किं. 5 लाख रू. असा एकुण 5,77,000 रू. चा मुददेमाल जप्त

मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक श्री. विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २९/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक रात्रौ दरम्याण पो.स्टे. वसमत शहर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, काही इसम ग्रामीण भागात अवैध्दरित्या व विनापरवाना विक्रीकरीता देशी दारूचे पेटया पार्सल घेवुन जात आहेत. अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत शहरात अत्यंत गोपनीय पध्दतीने व साध्या वेशात सापळा रचुन एक स्वीफ्ट डीझायर कार क.एम.एच. ३८ ७८७० असा पासिंग नंबर नोंद असलेले पकडुन त्याची तपासणी केली असता त्यात खालील प्रमाणे विना परवाना अवैध्यरित्या विकीकरीता घेवुन जाणारे.
१) १५ पेटी ज्यात १८० एम.एल. देशी दारू चे प्रत्येक पेटीत ४८ बॉटल असेलेले व ०१ पेटी ज्यात ९० एम.एल. देशी दारूचे १०० बॉटल असलेले असे एकुण १६ पेटी देशी दारू किंमत ७७,००० रू. व नमुद स्वीफ्टकार किं.५,००,०० रू. असा एकुण ५ लाख ७७ हजार रू. मुददेमाल जप्त करण्यात आले.

व नमुद दारूचा मुददेमाल घेवुन जाणारे १) ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण वय २५ वर्ष २) सुदर्शन देविदास चव्हाण वय २४ वर्ष दोन्ही रा. आडगाव रंजे व नमुद मुददेमाल ज्यांचे देशी दारू दुकाणातुन व सप्लाय करीता काढुन देण्यात आले दुकाणाचे मालक ३) सुरेशप्रसाद माणिकलाल जैस्वाल व काढुन देणारे ४) नंदकिशोर द्वारकादास जैस्वाल दोन्ही रा. वसमत अशा ०४ इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये पोस्टे वसमत शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक श्री. विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन यांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم