तरुणावर गोळीबारः संतप्त जमावाची दगडफेक, जाळपोळ; असोल्यात तगडा पोलिस बंदोबस्त
महाराष्ट्र 24 न्यूज
19 जुलै 2024
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला
येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयिताच्या घरावर दगडफेक करून दुचाकी जाळली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. असोला येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातील दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
२०० ग्रामस्थांच्या जमावाने घेतली पोलिस चौकीवर धाव
संतप्त सुमारे २०० पेक्षा गावकऱ्यांचा जमाव जवळा बाजार चौकीवर आला. या वेळी असोला पाटीजवळ असलेले दोन ट्रॅक्टरही जमावाने पेटवून दिले. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. पोलिसांनी बालाजी यास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंगोलीतील असोला येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त जमावाने जवळाबाजार पोलीस चौकीवर धाव घेतली होती
إرسال تعليق