भाजप लोकसभा प्रमुखपदी रामदास पाटील यांची निवड

भाजप लोकसभा प्रमुखपदी 
रामदास पाटील यांची निवड 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
24जुलै 2024

हिंगोली,  भारतीय जनता पक्षाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांची लोकसभा प्रमुखपदी नुकतीच पक्षाच्यावतीने नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर सहा विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यात भाजपकडून विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर क्लस्टर आणि लोकसभा प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक विधानसभेत आगामी निवडणुकीची रणन ीती आखण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन तेथील परिस्थितीची माहीती घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी
संवाद साधला जाणार आहे. त्यानुसार हिंगोली लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 दरम्यान, भाजपाचे दोन लोकसभा मतदार संघाचे एक क्लस्टर तयार केले असून त्यासाठी एक क्लस्टर प्रमुख नियुक्त केला आहे. याशिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी लोकसभा प्रमुख तर विधानसभेसाठी विधानसभाप प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे. क्लस्टर प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण काम करणार आहेत. नांदेड व हिंगोली लोकसभा क्लस्टर प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण तर हिंगोली लोकसभा प्रमुखपदी रामदास पाटील सुमठाणकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय हिंगोली विधानसभेसाठी आ. तान्हाजी मुटकुळे, वसमत उज्ज्वला तांभाळे, कळमनुरी माजी आ. गजाननराव घुगे यांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم