शरद पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यतानिवडणूक आयोगाचा निर्णय

शरद पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता
निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
9जुलै2024
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला अधिकृत मान्यता मिळाली आहे.
राज्यात काही महिन्यांवर
विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी पक्षाला निधी उभारण्यासाठी शरद पवार गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची विनंती केली होती. त्याची सुनावणी सोमवारी (ता. ८) झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. आता या पक्षाला कलम 29B नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय
 राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे मूळ पक्ष आणि चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. तेथील निर्णय प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णय चर्चेचा बनला आहे

Post a Comment

أحدث أقدم