असोला गोळीबारप्रकरणी कारवाईसाठी दहा दिवसांचा अवधी; आंदोलन तूर्त स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
27जुलै2024
हिंगोली : औंढा नागनाथ
तालुक्यातील असोला ढोबळे येथील गोळीबारप्रकरणी येत्या दहा दिवसांत मराठा समाजाच्या मागण्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाने दिली. त्यामुळे कारवाईसाठी दहा दिवसांचा अवधी देऊन आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा ठराव सकल मराठा समाजाने घेतला आहे.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. सकल मराठा समाजाने प्रशासनाला दिलेल्या
निवेदनातील सहा मागण्यांविषयी
प्रशासनाने काय पूर्तता केली, याची विचारणा केली. त्यावर हल्लेखोर बालाजी नागरे व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने तडीपार प्रस्ताव कारवाईसाठी पाठविला जाणार आहे. खातेनिहाय चौकशीत दोषी आढळल्यास एपीआय बोराटे व बीट अमादार यांना दहा दिवसांत निलंबित केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणे, हल्लोखोर बालाजी नागरे याचे मोबाइल कॉल डिटेल्स काढून त्यास मदत करणाऱ्या राजकीय व्यक्तींचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले, तसेच गंभीर जखमी मराठा सेवक मारुती पावडे यांना ५० लाख रुपयांच्या मदत व नुकसानभरपाईचा प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधीकडे
जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली. येत्या दहा दिवसांत कारवाई करण्याची ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली, तसेच अन्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. त्यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्याची मागणी शिष्टमंडळाला केली. त्यामुळे शिष्टमंडळातील मराठा समन्वयक व मराठा सेवक यांनी दहा दिवसांची अवधी देण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ६ ऑगस्टपर्यंत कारवाईसाठी वेळ देऊन आंदोलनास तुर्तास स्थगिती देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. दि. ६ ऑगस्ट रोजी पुन्हा सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली
إرسال تعليق