मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौ-यावर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
12 अगस्ट 2024
हिंगोली, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवार (दि.१२) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
إرسال تعليق