हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी अभिनव गोयल आज पदभार स्विकारणार
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
30 ऑगस्ट 2024
हिंगोलीच्या
जिल्हाधिकारी पदी धुळे येथील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश बुधवारी २८ ऑगस्टला काढण्यात आले आहेत. ते आज पदभार स्विकारणार आहेत.
हिंगोली चे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची ८ ऑगस्ट रोजी धुळे येथे बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या कडे होता. त्यानंतर हिंगोलीत नवीन जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आज शासनाने
अभिनव गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी गोयल मूळचे मेरठ (उत्तर प्रदेश) येथील आहेत. त्यांनी यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सन २०१५ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी नांदेड व लातूर जिल्ह्यात काम केले आहे. किनवट (जि. नांदेड) येथे २०१८ ला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुंढे त्यांची
लातूरच्या जिल्हा
परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. नांदेड व लातूर जिल्ह्यात त्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप उमटवली. या कार्यकाळात त्यांनी यांनी आदिवासी आश्रमशाळांचा कायपालट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जनतेचे प्रश्न मार्गी लावून विविध योजनाही राबविल्या. त्यानंतर त्यांची धुळे येथील जिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. जिल्हाधिकारी पदी गोयल यांची नियुक्ती झाल्याने आता प्रशासनातील मुख्य रिक्त पदाचा प्रश्न दूर झाला असून आता जिल्ह्यातील कामचुकार अधिकाऱ्यांनी धसकी घेतली आहे
إرسال تعليق