मनसे स्वबळावर निवडणूका लढविणार
प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
06 ऑगस्ट 2024
हिंगोली - आगामी होऊ घातलेल्या विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेना संपूर्ण राज्यात स्वबळावर निवडणुका लढविनार असल्याचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगीतले.
येथील विश्रागृहात मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते, यावेळी जिल्हाप्रमुख बंडू कुटे , वडकुते अजिंक्य घुगे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मनसे नेते संभुस बोलतांना पुढे म्हणाले, आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पक्षप्रमुख राज ठाकरे हे ८,९, ऑगस्ट अश्या दोन दिवस हिंगोली दोऱ्यावर येणार असल्याचे सांगून , उमेदवारांची चाचपणी केली जाणार असुन , पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत. मनसे हिंगोली जिल्हयातील तिन्ही विधानसभा स्वबळावर लढविणार असल्याचे सूचक विधान केले.
पुढे ते म्हणाले, पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल असे सांगून राज ठाकरे यांच्या दोऱ्या दरम्यान शिवसेना, उबाठा, अश्या अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असल्याचा त्यांनी गौप्य स्फोट केला.
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनिसी निवडणुका लढविणार असुन तिन्ही मतदार संघात इच्छुक उमेदवार आसलेल्या कार्यकर्त्यांची राज ठाकरे चाचपणी करण्यासाठी येणार असुन तसेच पक्षाची बांधणी देखिल करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे हिंगोली सह संपूर्ण राज्याचा दोरा करणार आहेत. त्यानुसार आठ, नऊ ऑगस्ट रोजी हिंगोलीत मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असुन, पक्षबांधणी सह उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी येणार आहेत. दोऱ्याच्या निमित्याने जोरदार तयारी केली जात असल्याचे संभुस यांनी सांगितले. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा मनसे सर्व ताकदीने लढविण्यासाठी सज्ज असुन त्याची तयारी देखील सुरू आहे.
إرسال تعليق