महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
24 ऑगस्ट 2024
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह २३ ऑगस्टला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्यात घरासमोर आढळून आला असून, या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. माधव बाबूराव गोरे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी माधव गोरे यांचा मृतदेह घरासमोरच आढळला. पोलिस पाटील त्र्यंबकराव कन्हाळे यांनी ही
माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याला कळविली. गुरुवारी रात्री सर्वजण जेवण करून घरात झोपले होते. दरम्यान, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माधव याचा मृतदेह त्याच्यात घरासमोरच आढळून आला. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी गोकर्णा बाबूराव गोरे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा माधव बाबूराव गोरे याचा कोणीतरी अज्ञात कारणावरून गळा आवळून मारहाण करून खून
केला. त्यानंतर तर मृतदेह घरासमोरील ओट्यावर ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड, आदींनी घटनास्थळी भेट दिली.
إرسال تعليق