हिंगोली जिल्हयातील गणेशोत्सव शांततेत संपन्न गणेश स्वयंसेवक व पोलीसांचा गौरव

हिंगोली जिल्हयातील गणेशोत्सव शांततेत संपन्न  गणेश स्वयंसेवक व पोलीसांचा गौरव

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
21 सप्टेंबर 2024
सन २०२४ मध्ये हिंगोली जिल्हयात श्री गणेश स्थापणा, विसर्जन तसेच श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी स्वयंसेवक, सामाजिक संघटना व पोलीस दल यांनी मौलाची भुमिका बजावली त्यामुळे त्यांचा गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पणेतुन मा. जिल्हाधिकारी श्री. अभिनव गोयल, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला.

श्री गणेशोत्सव सन २०२४ अंतर्गत हिंगोली जिल्हयामध्ये एकुण (१४६४) सार्वजनिक श्री गणेश मंडळांची स्थापणा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे  विघ्नहर्ता चिंतामणी गणपती चे जवळपास दिड लाख भाविकांनी दर्शन घेतले. हिंगोली जिल्हयातील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन आणि श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाचे वतीने सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक यांचा सहभाग करून घेण्यात आला. या सर्वांनी गणेशोत्सव २०२४ शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली.

गणेशोत्सव सन २०२४ शांततेत पार पाडण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावणा-या व गणेशोत्सव दरम्यान "स्वच्छता अभियान" "रक्तदान शिबीर" या सारखे सामाजिक उपक्रम राबविणा-या स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक तसेच पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व निवृत्त पोलीस अधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन हिंगोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी श्री. अभिनव गोयल, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले, मा. पोलीस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश दळवे,  मारोती थोरात, पो.नि.विकास पाटील, स्था.गु.शा., पो.नि. सुधिर वाघ, जि.वि.शा. तसेच हिंगोली जिल्हयातील पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंमलदार, श्री गणेश मंडळ स्वयंसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم