राज्यात गुलाबी थंडीचा कडाका वाढणार !
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 नोव्हेंबर 2024
आजपासून तापमानाचा पारा घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबईः मुंबईसह राज्याच्या
बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील चार राज्यांत होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी आज रविवारपासून पुन्हा थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञानी व्यक्त केला आहे. रविवारपासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगांव, नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही. या वातावरणामुळे सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला रविवारपर्यंत काहीसा विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
إرسال تعليق