घरात घुसुन मारहान दरोडा टाकल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
19 डिसेंबर 2024
घटनेची
सविस्तर माहिती अशी की
पोलीस स्टेशन अखाडा बाळापुर येथे फिर्यादीने फिर्याद दिली कि दि.23.07.2022, तक्रारदार हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या घरात दुसऱ्या मजल्यावर राहत होते. तळमजल्यावर त्यांचा कंपाउंडर विकास घोडसे झोपला होता. रात्री सुमारे 2.30 वा. त्याला काही आवाज आला आणि म्हणून तो जागा झाला. लोखंडी रॉड असलेल्या दोन व्यक्तींनी काळ्या कपड्याने तोंड झाकले होते. या व्यक्तींनी बळजबरीने दुसऱ्या मजल्यावर त्याची पत्नी व मुले उपस्थित होती. या आरोपींनी फिर्यादीला धमकावून पैसे व दागिन्यांची मागणी केली. त्यांनी रु.8000/- चे सोन्याचे लॉकेट, रु.80,000/- चे मिनी गंथन, रु.40,000/- च्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. त्यांनी त्याच्या कंपाउंडरलाही जखमी केले.
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून विरुद्ध पोलीस स्टेशन अखाडा बाळापुर येथे गु. र. नं. 288/2022 कलम 394, 511, 395, 397, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला .
सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे सोनाजी चंपती शिंदे याने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती एस एन माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 07/12/2024 रोजी आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق