हिंगोलीत व्यापाऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणुक रोषेन बाहेती सह
पाच जणांवर पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 फेब्रुवारी, 2025
हिंगोली शहरात कमी किंमतीत गहू खरेदी करून त्याचे पिठ करून विक्री केल्यानंतर वाढीव नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणुक (Fraud) केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात (Police station)पाच जणांवर शुक्रवारी १४ फेब्रुवारीला रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यापाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणुक
पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील पटलन भागातील व्यापारी रऊफखान पठाण यांना पाच जणांनी समर्थ फ्लोअर मिल नावाची पिठ तयार करण्याची फॅक्ट्री असल्याचे सांगितले. या फ्लोअर मिलमध्ये कमी किंमतीत खरेदी केलेल्या गव्हाचे पिठ तयार करून विक्री केल्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. यामध्ये चौघे जण हिंगोली शहरातील असल्यामुळे रऊफखान यांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यानंतर या पाच जणांनी रऊफखान यांना नागपूर येथून कमी किंमतीच गहू खरेदीची निवीदा काढली जात असून त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागत असल्याचे सांगितले. त्यासाठी तातडीने पैसे देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पैसेही दिले. तीन ते चार वेळा त्यांनी व इतर काही व्यापाऱ्यांनी तब्बल ५१ लाख ३० हजार रुपये दिले. यामध्ये काही वेळा रोख रक्कम तर काही वेळा त्यांच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर (transfer) केले. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी हि रक्कम दिली होती. यामध्ये काही रक्कम हात ऊसने घेतली होती.
मात्र रऊफखान यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्यांनी टाळाटाळ चालविली होती. त्यानंतर हिंगोलीत राहणारे चौघेही फरार झाले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रोशन बाहेती, तृप्ती बाहेती, प्रिती बाहेती, पवन बाहेती (रा. एनटीसी हिंगोली), राम सारडा (रा. आंबाजोगाई, जि. बीड) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस. उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.
إرسال تعليق