घरकुलाचा दुसरा हप्ता अभियंतासह दोघांना रंगे हाथ पकडले
हिंगोली
लाच लूचपत विभागाची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 फेब्रुवारी 2025
सविस्तर माहिती अशी की
आरोपी लोकसेवक सागर साहेबराव पवार , वय ३६ वर्षे, पद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, नेमणूक - पंचायत समिती कळमनुरी,राहणार सहयोग नगर कळमनुरी ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली
संजय मारोतराव मोरे, वय ५२ वर्ष व्यवसाय मजुरी, राहणार कामठा, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली
तक्रारदार यांचे मंजूर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाची पाहणी करून घरकुलाचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यांनी 15000/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली.
तक्रारीची पडताळणी
तक्रारदार यांनी दिनांक 24/02/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे लिखित तक्रार दिली होती. त्या तक्रारीचे अनुषंगाने आज दि.24/02/2025 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000 /- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
सापळा कारवाई
यातील आरोपी लोकसेवक क्रमांक 1 याने तक्रारदार यांना घरकुल विभाग पंचायत समिती कळमनुरी येथे दि.24/02/2025 रोजी पंचासमक्ष लाचेची रक्कम 15, 000/- रु खाजगी इसम संजय मारोतराव मोरे यांच्याकडे देण्याची सांगितले. आरोपी क्रमांक 1 याचे सांगणे वरून तक्रारदार यांच्याकडून आरोपी खाजगी इसम संजय मोरे यांनी 15000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले आहे.
आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू
आरोपी क्रमांक १ यांचे जवळ रोख 9050/- रुपये व आरोपी क्रमांक 2 यांच्या जवळ रोख 2200/- रू मिळून आले.
आरोपीताची घरझडती आरोपीताची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये रोख रक्कम मिळाली नाही याबाबत अधिक तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. घर झडती करताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे.
आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांचे विरुद्ध पो.स्टे. कळमनुरी जि. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
सापळा/तपास अधिकारी
श्री. विनायक जाधव, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली
सापळा पथक
ASI युनूस शेख, विजय शुक्ला पो. अंमलदार तान्हाजी मुंढे, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, पंडित वाघ, गजानन पवार, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,हिंगोली
मार्गदर्शक अधिकारी
श्री.संदीप पालवे,
पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
डॉ.संजय तुंगार,
अप्पर पोलीस अधीक्षक,
नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
पर्यवेक्षण अधिकारी
श्री. विकास घनवट,
पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. हिंगोली
9822259932
संपर्क
02456-223055
टोल फ्री
1064
إرسال تعليق