उपवासाला भगर खाताय; पण जरा जपून!अन्न व औषध प्रशासनाचे उपास धारकांना आवाहन

उपवासाला भगर खाताय; पण जरा जपून!
अन्न व औषध प्रशासनाचे उपास धारकांना 
आवाहन 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
26 फेब्रुवारी 2025 
हिंगोली : जिल्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी
महाशिवरात्रोत्सव साजरा होणार असून, या दिवशी भाविक उपवास करतात. फराळ म्हणून प्रामुख्याने साबूदाणा, भगरीचा वापर होतो. परंतु, भगरीचा फराळ करताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अनंता चौधरी यांनी केले आहे.

जिल्ह्यात महाशिवरात्रोत्सवाची शिवालयांमध्ये तयारी आठवड्यापासून सुरू असून, शिवभक्त मोठ्या उत्साहात महाशिवरात्रोत्सव साजरा करतात. या दिवशी उपसा करून महादेवाची आराधना करण्यात येते. यानिमित्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. शिवाय ठिकठिकाणी फराळ वाटपही होतो. या फराळात प्रामुख्याने भगरीचा वापर करण्यात येतो. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय विक्रेत्यांनीही स्वच्छ
तर कारवाई
विक्रेत्यांनी पॅकबंद भगरीची विक्री करावी, भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांनी पावती द्यावी, भगरीचे उत्पादन केव्हाचे आहे, किती दिवस चालणार याची खात्री करूनच विक्री करावी. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेवू नये.

...म्हणून होऊ शकते विषबाधा

भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पारीगिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये (टॉक्सिन) तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास भगरीतून विषबाधा होऊ शकते.

आणि खाण्यायोग्य असलेल्या भगरीची विक्री करावी, अन्यथा अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई

काय काळजी घ्यावी?

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी, शक्यतो पाकीटबंद भगर घ्यावी, चांगल्या कंपनीची, लेबल नसलेली, सुटी भगर घेऊ नये, पाकिटावर पॅकिंग व वापराचा अंतिम दिनांक तपासावा, भगर स्वच्छ कोरड्या ठिकाणी ठेवावी, जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नये, भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असेल तर या पदार्थाचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेत करावे.
करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने