अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्या प्रकाणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
28 फेब्रुवारी 2025
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 03/07/2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, आरोपीने फिर्यादीची अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले या आरोपावरून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे गु. र. नं 289/2024 कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर गुन्हयात पीडीता मिळून आल्यानंतर तिने बयान दिले कि आरोपीने पिडीतेला लग्नाचे अमीष दाखवून चार महिन्यात वारंवार बलात्कार केला.
तरी पिडेतेच्या बयानावरून सदर गुन्हामध्ये भारतीय न्याय संहिता चे कलम 65, 87 व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO Act-2012) चे कलम 3, 4, 6, 8, 12अन्वये गुन्हा वाढविण्यात आला होता.
सदर प्रकरणामध्ये वि जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे विशेष खटला क्र 79/2024 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
तरी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले आणि या प्रकरणतील आरोपी, पवन मंचकराव देशमुख याच्या वतीने वतीने ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले.
दिनांक 18/02/2025 रोजी विद्यमान न्यायधिश मा. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तीवाद एकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा