परीक्षेच्या काही तासांनंतर १०वीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्मशाळा प्रशासनाला पत्ताच नाही

परीक्षेच्या काही तासांनंतर १०वीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म
शाळा प्रशासनाला पत्ताच नाही

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 फेब्रुवारी 2025 
मलकानगिरीः सरकारी
निवासी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या या मुलीने बोर्डाची परीक्षा देऊन परतल्यानंतर चित्रकोंडा उपविभागीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला. मीडिया रिपोर्टनुसार ही मुलगी नियमित शाळेत जात राहिली, इतकेच नाही तर तिने बोर्डाची परीक्षा देखील दिली. मात्र तिच्या स्थितीबद्दल
शाळा प्रशासनाला कसलीहीं कल्पना नव्हती. या मुलीच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाला यासाठी जबाबदार धरले आहेत. तर शिक्षकांनी मुलगी राहत होती त्या हॉस्टेलच्या वॉर्डनवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर चित्रकोंडा पोलिस आणि जिल्हा कल्याण अधिकारी (DWO) यांनी या. प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने